सारस्वत विकास मंडळ, कोल्हापूर

वसतिगृहाच्या स्थापनेनंतर पुढील काळामध्ये अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली. ज्याचा प्रभाव समाजावर पडून जीवनशैली, कुटुंबव्यवस्था, सामाजिक गरजांमध्ये बदल दिसू लागले. वसतिगृहासाठी काम करत असताना समाजधुरीणांना शिक्षणाव्यतिरिक्त इतरही सामाजिक गरजा व अडचणी लक्षात आल्या. सदर अडचणींचे निराकरण करणेसाठी व्यापक हेतूने कार्यरत संस्थेची गरज भासू लागली, म्हणून सारस्वत विकास मंडळ, कोल्हापूर या संस्थेची स्थापना करणेत आली. ही संस्था विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आहे.

12/04/1975 साली जसे विकास मंडळ स्थापन झाले त्याच्या उद्दीष्टामध्ये आपण वधूवर सुचक मंडळ स्थापन केले सारस्वत वधूवर मंडळाचेही हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे त्यावेळी कै. अ. गो. कामत व के आशालता ताई कामत हे दोघे ते पहात असत. त्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली मेळावा घेण्याचे नियोजन केले गेले.

नंतरचा काळात सारस्वत विकास मंडळच्या माजी अध्यक्षा श्रीमती अनुराधा तेंडूलकर यांनी त्यात सुधारणा करून फॉर्म छापून घेणे व नियमित मेळावे घेणे सुरू केले. साधारणपणे 1994 पासून नियमित मेळावे घेणे सुरू केले. बेळगाव, हुबळी, कारवार, सांगली, सातारा, गोवा, बेंगलोर, नाशिक, कुडाळ, कणकवली, नागपूर, हैद्राबाद, चिपळूण, रत्नागिरी, पूणे, मुंबई, सोलापूर, पंढरपूर, विजापूर, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, परदेशी नोकरी करत असलेल्या वधू वरांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहेच.

मा. श्री. शरद प्रभावळकरांनी 2012 साला पासून मोठे योगदान दिले. व व्यवस्थित पध्दतीने कामकाज चालू झाले. त्यामध्ये अधिक सुसुत्रता आणली साधारणपणे पाच मेळावे हे दरवर्षी मोफत घेतले जातात. वधूवर मंडळाचे हे कामकाज वाढत गेले व त्यात सुधारणा होत गेल्या आता मोवाईल वर व कंप्युटरर्स वर कामकाज सुरू झाले आहे. मा. श्री अनिकेत दलाल यांनी आपल्या मंडळास कंप्युटर व लॅपटॉप दिला आधुनिक काळानुसार बदल केला आहे आता सध्या वॉटसअॅप वर वधू वरांची लिस्ट पाठवली जाते. याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे कंप्यूटरर्स वर सर्व वधू वरांची नोंदणी केली जाते.े.

आता 2024 मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वधूवर मंडळाचे कामकाज हे वेबसाईट मार्फत (Online) सुरू झाले आहे.

सामाजिक कार्यक्रम

सामाजिक कार्यक्रम

सामाजिक कार्यक्रम

वधूवर व पालक परिचय मेळावा समाजातर्फे वधूवर सूचक केंद्र चालवले जाते. दर महिन्यांच्या दुसन्या व चौथ्या शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये वसतिगृहातील अभ्यासिकेत वधूवर नोंदणी व वधूवर विषयक माहितीची देवाण घेवाण केली जाते. प्रतिवर्षी पाच वधूवर पालक परिचय मेळावे घेतले जातात. या मेळाव्यांची माहिती व्हाट्सअँपद्वारे देणेत येते. मेळाव्यातील उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाची विनामूल्य व्यवस्था केली जाते. नोंदणीसाठी वार्षिक शुल्क रु.500/- घेतले जाते. मेळाव्यात सहभागी होणेसाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही. मेळाव्यास मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. सदर मेळाव्यातून आजपर्यंत अनेक विवाह ठरले आहेत.

सचिन जनवाडकर
अध्यक्ष

अध्यक्षांचे मनोगत

आपल्या संस्थेचा स्थापनेपासूनच्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेणेसह विविध कार्यक्रमाद्वारे यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष हे आनंदात साजरे करावे असा मानस आहे. आधुनिकीकरणाबरोबर समाज व्यवस्थेत अनेक समस्या निर्माण झाल्याआहेत, 'सॅटेलाईट' कुटुंबे ही त्यातीलच एक. याचबरोबरच अनेक गरजा ही निर्माण झाल्या. आपला समाज तसा फारच लहान त्यामुळे या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व नवीन पिढीवरील संस्कार हे विषय समोर आले. आजपासून पन्नास वर्षांमागे संस्थापकांनी याचा पूर्ण विचार करून या संस्थेची स्थापना करून 'सामुहिक' कुटुंबाची संकल्पना राबवली. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांना एकत्र आणून या समस्यांची सोडवणूक परिणामकारकरित्या होत आहे. अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

आपले ज्ञाती ज्येष्ठ कै. ॲड. शंकरराव दाभोळकर, प्राचार्य ए. बी. रेगे, प्रो. दुभाषी, डॉ. के. सी. प्रभू, श्री. हेमाडी, श्री. राजाध्यक्ष, श्री. रामकृष्ण शानभाग, श्री. श्रीकांत शानभाग, श्री. विनायक पै, श्री. व्यंकटेश पै., श्री. महामाया कामत, श्री. गर्तप्पा प्रभू प्रभृती, तसेच श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहचे विश्वस्त, सभासद यांनी आपली संस्था स्थापन करून कार्यरत केली. आपल्या संस्थेच्या सभासदांनी आपल्या मातृसंस्थेला अडचणीचे वेळी स्वतः अडचण सोसून भरीव मदत केली आहे.

हितचिंतक आणि कार्यकर्तेयांच्या बहुमोल सहभागामुळे आपली संस्था सर्वांगीण प्रगती करू शकली आहे आणि तरुण पिढीच्या जडणघडणीसाठी हे मोठेच व्यासपीठ निर्माण झाले आहे. येत्या काळात संस्था अधिक सक्षम आणि व्यापक पायावर उभी करून एक आदर्श निर्माण करूया. आपल्याला प्रत्येक सारस्वत कुटुंबापर्यंत पोहोचायचे आहे हे ध्येय ठेवून पुढील वाटचाल करू. 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ।' सर्व सारस्वत बांधवांनी आपल्या संस्थेचे सभासद होऊन आपला सहभाग नोंदवावा असे मी या प्रसंगी आवाहन करीत आहे.

श्री. संजीव बोरकर
उपाध्यक्ष
श्री. मुकुंद कुलकर्णी
सचिव
श्री. गुरुनाथ देशपांडे
खजिनदार
ऍड . शरद खासनीस
सहसचिव
श्री. दीपक देशपांडे
विश्वस्त
श्री. सु. ची. कुलकर्णी
विश्वस्त
श्री. गिरीष घोलकर
विश्वस्त
श्री. सुनील होळणकर
विश्वस्त
श्री. विठ्ठल कुलकर्णी
निमंत्रित
सौ. माधवी देशपांडे
निमंत्रित